Author Topic: फक्त खुश राहा तु मला सोडून.....  (Read 1561 times)

आता कायमची जा निघून तु,
माझ्या संपलेल्या आयुष्यातून.....

नाहीच कधी आठवणार मी,
खरच विसरेल तुला मनातून.....

आता नाहीच होणार माझा त्रास तुला,
कायमची मुक्त केले तुझ्या माझ्या भांडणातून.....

खुप ठेवलास मान माझा,
अब्रुचे दिंडवडे काढलेत चार चौघातून.....

तु खोटी होतीस खोटी होती प्रित तुझी,
आपलेपण वाटलच नाही कधी तुझ्या वागण्यातून.....

खोटेच प्रेम होते तुझे,
वेळोवेळी जाणवले तुझ्या बोलण्यातून.....

आता काहीच नाही बोलायचे मला,
फक्त खुश राहा तु मला सोडून.....

फक्त खुश राहा तु मला सोडून.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०७-१२-२०१३...
रात्री १०,२३...
© सुरेश सोनावणे.....