Author Topic: तीची कविता...  (Read 988 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,265
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
तीची कविता...
« on: December 09, 2013, 07:08:44 PM »
तीची कविता...
   
तो जेथे असेल तिथे
तू जाऊ नकोस,
भिजल्या आठवणीना
कोंब आल्याचे त्याला
कधीच सांगू नकोस !

छप्पर गळतय,
ते गळू दे,
थेंब थेंब...
गालावर वाहू दे,
दोष नव्हता त्याचा तो,
माझे मलाच कळू दे !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता