Author Topic: माझ्यासारखं कधी तरी, तू ही जगून बघ.....  (Read 1930 times)

माझ्यासारखं कधी तरी,
तू ही जगून बघ.....

मनात दु:ख असताना,
तू ही हसून बघ.....

विरहात होणारा त्रास,
तू ही सोसून बघ.....

माझ्यासारखं कधी तरी,
तू ही जगून बघ.....

कधी तरी आठवणीत,                   
तू ही हरवून बघ.....

काट्यांनी भरलेल्या वाटेवर,
तू ही चालून बघ.....

माझ्यासारखं कधी तरी,
तू ही जगून बघ.....
       
सुख अनुभवताना एकदा,
तू ही रडून बघ.....

खुप दु:ख ते स्वत:वर,
तू ही घेऊन बघ.....
 
माझ्यासारखं कधी तरी,
तू ही जगून बघ.....

माझ्यासारखे जिवंतपणी, 
तू ही मरून बघ.....

डोळ्यातून दोन थेंब अश्रू,
तू ही वाहून बघ.....     

माझ्यासारखं कधी तरी,
तू ही जगून बघ.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(
 
_____/)___/)______./¯”"”/’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„\)

स्वलिखित -
दिनांक ११-१२-२०१३...
सायंकाळी ०६,४६ ...
© सुरेश सोनावणे.....           


Marathi Kavita : मराठी कविता


viraaj more

  • Guest
Same to same my luv story sir. . . . . . I seluet u.!