Author Topic: नको जाऊस सखे तू......  (Read 1205 times)

Offline Pedhya

  • Newbie
  • *
  • Posts: 43
नको जाऊस सखे तू......
« on: December 18, 2013, 01:33:31 PM »
नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू......

तुझ्यात पार गुंतुण गेलो मी,
कशातही उरून न रहिलो मी……

नको जाऊस इतक्यात साथ सोडून सखे तू,
अधूरा राहीन मी.. जर गेलीस जीवनातून माझ्या तू......

हसू नकोस तू अबोल अशी,
येऊन जा एकदा माझ्या मनाशी.......

नजरेत माझ्या नजर मिळव एकदा,
दिसतील तुझ्याच प्रतिमा त्यात अनेकदा......

प्रत्येक वेळी स्वपनांत येते तू अशी,
जणू एक स्थान करून जाते हृदयाशी.......

तुझे स्मित हास्य देऊन जाते एक आशा जगण्याची,
त्यात नाही उरली आता भिती मरण्याची........

नको घेऊस परीक्षा आता माझ्या प्रेमाची,
देऊन जाईल आठवण ती निरंतर आपल्या नात्याची......

आता फक्त तू तिथ मी.... अन् मी तिथ तू,
मिळून जगु आयुष्य दोघे....
नको “मी”.... अन् नको तो “तू",
आता फक्त “आपण” अन् “आपणच” दोघे…

Pankaj 9096140013

Marathi Kavita : मराठी कविता


विभावरी

  • Guest
Re: नको जाऊस सखे तू......
« Reply #1 on: April 27, 2014, 10:29:13 PM »
गेली "सखी" सोडून साथ
"का?" ह्या प्रश्नाचा मूलभूत,
असे इष्ट शांतपणे घेणे वेध