Author Topic: तुला आठवू पाहतो मी  (Read 1198 times)

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
तुला आठवू पाहतो मी
« on: December 18, 2013, 04:25:55 PM »
तुला आठवू पाहतो मी

कधी बंध तुटले, कधी स्वप्न विरले
निसटले कसे क्षण सुखाचे, कळेना ….

कधी पाश सुटली, कशी प्रीत विटली
हरवले कुठे दिस गुलाबी, कळेना ……

कितीदा तुला रोखले, साहले मी
तरीही तुझी पावले का वळेना? ……

कितीही मनाशी ठरवले जरी मी
तुला विसरण्याचे मला का जमेना?……

जरीही बदलली दिशा तू स्वत:ची
तरी का मला आठवे तू? कळेना ……

मिलिंद कुंभारे

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शितल

 • Jr. Member
 • **
 • Posts: 137
 • Gender: Female
 • हळुवार जपल्या त्या भावना….
Re: तुला आठवू पाहतो मी
« Reply #1 on: May 17, 2015, 03:41:47 PM »
aavadli......... uttam....

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: तुला आठवू पाहतो मी
« Reply #2 on: May 17, 2015, 05:24:18 PM »
शीतल,
धन्यवाद.....प्रतिसादबद्दल.....