Author Topic: कुठे आहेस तू ?  (Read 1197 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,193
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
कुठे आहेस तू ?
« on: December 21, 2013, 07:14:43 PM »
कुठे साद घालू ? कुठे आहेस तू ?
एकटा मी इथे, परतुनी त्वरी ये तू !

उरी स्मृती तुझ्या, गातोय रोज विराणी
घेशील का धाव, ऐकून माझी गाणी
सांग ऐकलीस का तू ?

फिरतोय चौफेर साऱ्या, दडलीस कोण्या दारी
थकलीत पाऊले माझी, फिरून दुनिया सारी
सांग आहेस कुठे तू?

नसण्याने दु:खी तुझ्या, सलतोय एकटेपणा 
मरावं कि जगावं ? करू काय सुचेना ?
सांग आता उत्तर तू !

न आसरा कुणाचा, न दिसे कुठे किनारा
शोधतात नेत्र तुला, लपाछपीचा खेळ सारा
सांग दिसशील कुठे तू ?©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता

कुठे आहेस तू ?
« on: December 21, 2013, 07:14:43 PM »

Download Free Marathi Kavita Android app

Join Marathi Kavita on Facebook

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):