Author Topic: अश्रू ...  (Read 1219 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
अश्रू ...
« on: December 22, 2013, 01:06:39 PM »
अश्रू ...

अश्रूंच्या प्रत्येक थेंबात
तूच दिसतेस मला, कारण...
डोळ्यांनी माझ्या फक्त
तूलाच पाहिलं होतं !

स्पर्श नाजूक मोरपिशी
भासतो उगी मनाला, कारण...
हातांनी माझ्या फक्त
तूलाच स्पर्शिल होतं !

शूभ्र हास्य खळाळणार
लाटांवर तरंगत होतं, कारण,,,
ह्रदयात माझ्या फक्त
त्याचच स्पंदन होतं !

जीवना पल्याड अंधारात
येईन म्हणतो भेटीला, कारण...
सोबतीनेच फक्त रहायचं
वचन देशिल भेटीचं ?


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता