Author Topic: मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही  (Read 890 times)

Offline vikrantborse

  • Newbie
  • *
  • Posts: 12

मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही

मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही,
आयुष्य अस एकदम काही कुणासाठी आटत नाही.
पण.. असेच कधी काही क्षण हलकेच गोठून जातात,
वेळ सरून गेली तरी वितळून वाहू पाहतात.
कितीही समजावलं मनाला तरी सालं त्याला कळत नाही.
मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही.

तश्या, तिच्या आठवणी सहसा मला कधी कुठेच दिसत नाही,
चुकूनही त्यांची माझी भेटगाठ घडत नाही.
पण.. असेच नकळत एकांतात त्या जवळ येउन जातात.
संधी मिळता लगेच त्या स्पर्श करू पाहतात.
एकट असं मनाला मी, म्हणून भटकूच देत नाही.
मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही.

मित्रांमध्ये तिचा तसा उल्लेख बऱ्याचदा होतो,
मी दुर्लक्ष करतो अन विषय दुसरीकडे नेतो.
पण... असेच तिचे काही विचार मनात डोकावुनी जातात.
आत कोठेतरी मग ते हळूच साचू, रुजू पाहतात.
मग, तिच्या-माझ्या मित्रांना मी पुन्हा भेटत नाही.
मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही.

विसर विसर म्हणतो खर पण विसर पडत नाही,
दिवस काय, रात्र काय, काहीच समजत नाही.
अन असाच कधीतरी झिंगून मी वेडावुनी जातो.
तिच्या अनेक स्मृतींना मग जिवंत करू पाहतो,
तरी आता नेहमीसारखी मी नशा करत नाही
खरच .....मला आता तिच्याविषयी इतक काही वाटत नाही?
--रत्नप्रवि-
Modify message