Author Topic: बघून घे तू अखेरचे ....  (Read 2220 times)

बघून घे तू अखेरचे ....
« on: December 24, 2013, 04:40:10 PM »
बघून घे तू  अखेरचे 
आज सजलेल्या माझ्या देहाला

आजवर कधी स्वीकारले नाहीस
बघ आज मृत्यूने केला स्वीकार माझा
नको पश्चाताप करू
मला जमणार हि नाही पुन्हा तुझ्यावर जीव  ओवाळायला ......

जातो सये  कायमचे आता
तू मात्र कधीच रडायचे नाहीस
अन  डोळे मिटल्यावर  दिसलोच कधी
तर मला तू तेव्हा घाबरायचे नाही

समजून घे प्रेमाला माझ्या
तुझ्या सुखासाठीच  निघून जातो आहे
माझ्या वाटेचे सुखांना तुझ्या पदरी सोडतो आहे

येईल तुला हि आठवण माझी
तू पहिली भेट आठवायची
मी भेटलेलो त्या जागेवर जाऊन
तू  फक्त ये पुन्हा हाक मारायची ....

मी मात्र येणार नाही
पण ....
मला खूप आनंदर होईल
माझ्या मारण्याला ह्या 
तेव्हा खरेच तेव्हा शांती साध्य होईल ....

बघून घे तू  अखेरचे 
आज सजलेल्या माझ्या देहाला .... :'(
-
©प्रशांत डी शिंदे

दि . २४/१२/२०१३

Marathi Kavita : मराठी कविता


patil h.a

  • Guest
Re: बघून घे तू अखेरचे ....
« Reply #1 on: January 05, 2014, 05:29:07 PM »
Jivanat have tr khup kahi aste
pan have tech milat narte.

Nikhil vinde

  • Guest
Re: बघून घे तू अखेरचे ....
« Reply #2 on: January 25, 2014, 08:48:00 PM »
Cchan ahe kvita yar!

Re: बघून घे तू अखेरचे ....
« Reply #3 on: February 03, 2014, 03:05:25 PM »
Cchan ahe kvita yar!
dhanyvad nikhil ......