Author Topic: का कुणावर येवढं प्रेम करतोय मी ???  (Read 2091 times)

का कुणावर येवढं प्रेम करतोय मी ???

का कारण नसताना,
रात्री रडतोय मी,
का विनाकारण स्वतःला,
खुप त्रास देतोय मी.....

का स्वतःला स्वतःच,
बदनाम करतोय मी,
का अचानक झोपेतून,
डचकून उठतो मी.....

का कुणावर येवढं प्रेम करतोय मी ???

का कुणासाठी एवढा,
उगाच झूरतोय मी,
का कुणाला परखं असूनही,
आपलंपण देतोय मी.....

का कुणाला माझी किँमत नसताना,
स्वतःपेक्षा जास्त जपतोय मी,
का कुणासाठी उगाच,
एवढं तडफडतोय मी.....

का कुणावर येवढं प्रेम करतोय मी ???

का कुणाच्या मोबाईल वर,
मसेज वर मसेज पाठवतोय मी,
का कुणाच्या नंबर वर,
वारमवार काँल करतोय मी.....

का कुणाच्या फेसबुक वाँल ला,
नेहमी निहारतोय मी,
का कुणाच्या रिप्लायची,
आतुरतेने वाट पाहतोय मी......

का कुणावर येवढं प्रेम करतोय मी ???

का कुणाच्या आठवणीत,
मनातल्या भावना मांडतोय मी,
का कुणाला शब्द रचताना,
कवितेत आठवतोय मी.....

का कुणाच्या आठवणींना,
फुलासारखं जपतोय मी,
का कुणासाठी स्वतःला,
विनाकारण छळतोय मी.....

का कुणावर येवढं प्रेम करतोय मी ???
:'(   :'(   :'(   :'(   :'(

_____/)___/)______./­­¯”"”/­­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­­\)

स्वलिखित -
दिनांक २७-१२-२०१३...
रात्री ०९ ,५२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Shyamal

  • Guest
A Song From Movie "Seema" (1955):

Tu pyaar ka saagar hai, tu pyaar ka saagar hai
teri ek boond ke pyase hum, teri ek boond ke pyase hum