Author Topic: नवे एकटेपण.....  (Read 1663 times)

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
नवे एकटेपण.....
« on: December 29, 2013, 02:31:28 AM »
सन्नाट या वाटेवरुनी,
एकटाच फिरत राहिलो...
नाही भेटल्या त्या वाटा,
ज्या मी स्वप्नात पाहिलो...
का मी नव्या या,
एकटेपणात सापडलो...
सुखाचे क्षण ते,
हरवून गेलो...
ज्या क्षणाला आपलं मानले,
आकाशाच्या ढगासारखं
का ते उडूनी गेले...
का मी नव्या या,
एकटेपणात सापडलो...
परि चालता चालता,
हातातुनी हात सुटले,
अन् काही क्षणात,
बघता बघता...
नातं हे आपले तुटले...
का मी नव्या या,
एकटेपणात सापडलो....
या नाजुक डोळी,
सागराचे पाझर फुटले...
तुझे ते आठवणीचे क्षण,
थव्यासवे का उडाले...
का मी नव्या या,
एकटेपणात सापडलो...
स्वयलिखीत -
स्वप्नील चटगे
« Last Edit: January 06, 2014, 08:55:50 PM by स्वप्नील चटगे »

Marathi Kavita : मराठी कविता


master pc kumar

 • Guest
Re: नवे हे एकटेपण..... का भेटले....
« Reply #1 on: December 29, 2013, 03:43:37 PM »
nice

Offline Lyrics Swapnil Chatge

 • Jr. Member
 • **
 • Posts: 353
 • Gender: Male
 • तुझ्या आठवणीचे क्षण....अन् क्षणात गुफंलेले वेडे मन
  • तुझ्या आठवणीचे क्षण...
Re: नवे हे एकटेपण..... का भेटले....
« Reply #2 on: December 29, 2013, 03:47:22 PM »
धन्यवाद....!!