Author Topic: डोळ्यांत फक्त आसवांचा किनाराच राहिला ....  (Read 1257 times)

किती तरी स्वप्न माझे अपूर्ण राहिले
डोळ्यांना वाट पाहणे आता रोजचेच  झाले

मिटलेली मुठ  ती आसवांची माझ्या
मुखावरच्या हसुने तुझा निरोप मी घेतला

कित्येक  स्वप्न माझे अपूर्ण ते
डोळ्यांत  फक्त  आसवांचा किनाराच  राहिला ....

परत   आलो एकटाच त्या अनोळखी विश्वातून
जिथे माझ्या भावनांचा खेळ सा~यांनीच   मांडला

आपलेच मानले होते तुला मी सये
इथेच  खरा दगा होता जाहला ....

तू नसतानाही कविता लिहल्या कित्येक आज
कविता  त्या बघ ओसाड  राहिल्या
प्रेमाचे  शब्द  तो माझ्या नाशिबतुनी वंचितच  राहिला .....

कित्येक  स्वप्न माझे अपूर्ण ते
डोळ्यांत  फक्त  आसवांचा किनाराच  राहिला ....


-

©प्रशांत डी शिंदे
दि .०७/०१/२०१४