Author Topic: मला आजही तुला विसरता आले नाही.....  (Read 1330 times)

आलेत गेलेत कित्येक पावसाळे,
अश्रूं माझे आजही,
बरसायचे थांबले नाही.....
* * * * * * * * * * * * *
खुप खुप रडलो आठवून तुला,
एक क्षणही चेहरा तुझा,
नजरेआड कधी गेला नाही.....
* * * * * * * * * * * * *
कधी खोटं खोटं हसलो,
कधी विनाकारण रुसलो,
कधी रडूनही रडलो नाही.....
* * * * * * * * * * * * *
बरेच दुःख मनात ठेवून,
निवडूंग होवून जगत होतो,
माझं मन कधी तुला कळले नाही.....
* * * * * * * * * * * * *
बेरंग झाले आयुष्य तुझ्या जाण्याने,
पुन्हा प्रेमाचे रंग कधी,
आयुष्यात भरले नाही.....
* * * * * * * * * * * * *
खुप खुप आवरले मनाला,
निर्धार ही केला विसण्याचा,
ह्रदयातून तुला काढणे जमले नाही.....
* * * * * * * * * * * * *
सर्वकाही अशक्यचे शक्य झाले,
विरहातून कसे बसे,
धडपडत स्वतःला सावरले.....
* * * * * * * * * * * * *
पण ??????????
* * * * * * * * * * * * *
मला आजही तुला विसरता आले नाही.....
विसरता आले नाही.....
* * * * * * * * * * * * *
I Miss u Shona...
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०९-०१-२०१४...
दुपारी ०१,१९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
एक गुणिले दहा किती ? (answer in English number):