Author Topic: तुला माझे प्रेम कधी कळलेच नाही .....  (Read 1466 times)


हस~या  चेहऱ्यावर माझ्या
आजही तुला हसूच  सापडतंय
तुला का ठाऊक आत लपलेल्या हृदय
किती दुख सोसतंय..........

तुला माझे नेहमी  ओरड्नेच  दिसत आले
तुझ्या हास्यासाठी माझे मान खाली झुकणे   
कधी दिसलेच  नाही...............

तुझ्या सुखांना दारात तुझ्या खेळते ठेवले
पण त्यांशी  झुंजण्यात माझे  सुखांची आहुती  दिली 
तुला मात्र कधी कळलेच नाही .........

तुझ्यासमोर असताना मी ही विदुषकासारखेच  वागलो
कारण तुझ्या डोळ्यांतले अश्रू मला कधी आवडलेच नाही

पण तरीही  दूर जायचे बोलतेस सारखी
खरेच  तुला माझे प्रेम कधी कळलेच नाही ....

खरेच तुला माझे प्रेम कधी कळलेच नाही .....
-
©प्रशांत डी शिंदे
दि.०९-०१-२०१४