Author Topic: निवांत निजलेला सारणावर.....  (Read 1097 times)

आयुष्यात असे कसे,
हे कटू क्षण आले.....
* * * * * * * * * *
की माझे आपलेच,
टपलेत माझ्या मरणावर.....
* * * * * * * * * *
आधाराला दिलेले हात,
आता आखडते केलेत.....
* * * * * * * * * *
दया माया नाही दाखवली कोणी,
माझ्या भावनिक रडण्यावर.....
* * * * * * * * * *
माझं दुःख समजणारं,
कोणच उरलं नाही.....
* * * * * * * * * *
विश्वास नाही कुणाचा,
माझ्या खरं बोलण्यावर.....
* * * * * * * * * *
आशेचा किनाराही,
दिसेनासा झाला आता.....
* * * * * * * * * *
स्वतःला पाहतोय मी,
निवांत निजलेला सारणावर.....
निवांत निजलेला सारणावर.....
* * * * * * * * * *
I Hate u My Life...
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १०-०१-२०१४...
दुपारी १२,०२...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


वैशाली

  • Guest
Re: निवांत निजलेला सारणावर.....
« Reply #1 on: January 13, 2014, 11:31:41 AM »
श्री. सोनावणे,

तुमच्याशी लग्न न करण्याचे कोणा तरुणीने ठरवल्य़ाबद्दल "जास्तीत जास्त" दुःख महिनानुमहिने करत बसण्यात (आणि ते दुःख कवितांमधून प्रकट करण्यात) काहीही "उदात्त" नाही. तुमचे उर्वरित आयुष्य समतोलपणे व्यतित करण्याकरता तुम्ही एखाद्या psychotherapistची मदत त्वरेने घ्यावीत. शुभेच्छा.