Author Topic: कशी हि भेट होती आपली ....  (Read 936 times)

कशी हि भेट होती आपली ....
« on: January 15, 2014, 04:45:36 PM »
कशी हि भेट होती  आपली
दोघांनी ही प्रेम म्हणून ती जपली

नात्यांची फिकर होती
ना कशासही सिमित
दोघांसही  ती  वाटली  आपली .........

एकमेकांनी स्वप्न पाहिले
पहिलेच  प्रेम होते ते
त्यावर दुखांचे धुके  दाटले

दोघांनी वाट  पहायची जाण्याची
पण  वेळ कधी नव्हतीच  जवळ  येण्याची
दूर  निघून  गेले ते   क्षण आज
राहिले  डोळ्यांत फक्त  आठवणी

माझी  होती तू  अन तुझाच  होतो मी
दोघांनी लिहलेल्या इतिहासात 
आता एकटाच  होतो मी ......
आता एकटाच होतो मी ....

कशी ही  भेट होती आपली ...
-
©प्रशांत डी शिंदे
दि.१४-०१-२०१४

Marathi Kavita : मराठी कविता