तू नाहीस
आठवले मला ते दिवस
मी सिगरेट पितो म्हणुन रागवली होतीस
शेवटची म्हणुन ती रोपटयात फेकली होती
आज त्या रोपाला फूल आले आहे,पण ते बघायला तू नाहीस
आठवले मला ते दिवस
मी शांत असतो म्हणुन तू रागावली होतीस
आता मला राग येतो
पण रागवायला तू नाहीस
तूच म्हणायचीस ,
स्वच्छंदी पक्षाप्रमाणे जग
अग मी माझे लक्ष्यसुद्धा गाठले
माझे यश बघायला ती नाहीस
आज.....
मी सिगरेट पितो
एक कोपरयात शांत बसून असतो
यशापासून कधीचाच दूर फेकलो गेलोय
फक्त तुझ्यासाठीच.................
पण तेही बघायला .......
ओंकार पाटकर