===================================================================================================
शेवटी तुला माझे डोळे समजलेच नाही
मी पापण्यांची झालर केली तुला उमगलेच नाही
डोकावलस ना तू त्या दिवशी त्यात
तुझाच रूप तुला का दिसले नाही ??
दोष तर माझा नक्कीच नाही हा
कदाचित तुझ्या नजरेत दोष असेल काही
डोळेच काई रे , मी सम्पूर्ण तुझीच झालिये
तरीही माझ्या डोळ्यांची भाषा तुला कळली नाही
तुझ्या भेटीची असोशी मी अश्रुतुन उलघडली
विरह हि तुझा मी अश्रुतुन मांडते ना
शब्दांपेक्षा मला अश्रु श्रेष्ठ वाटतात
म्हणुन तुझ्याशी बोलायला तेच बाहर येतात
पण आज माझ्या अश्रुना तू नाटक ठरवलेस
माझ्या भावनाना तू पायादाली तूडवलेस
मातीमोल करून टाकलास क्षणार्धात त्याना
इतक की तेहि अपमानाने जलाले
नको रे माझ्या अश्रुना नाटक हिनवुस
माझ्या इतकच तेही तुझ्यावर प्रेम करतात
म्हणुन आनंदात -दुखात धावत पळत येतात
कारण ते तुझ्याच रुपाचा आरसा असतात
बघ येवून एकदा परत डोळ्यात माझ्या
तुझाच रूप घेवून त्यातल्या बाहुल्या नाचतात
अस जर माझ्या अश्रुना नाटक ठरवशील , तर
माझे डोळे कायम मिटून अश्रुना आत बंदिस्त करून टाकतील
===================================================================================================
===================================================================================================