Author Topic: विसरु शकेल मी तुला, फक्त डोळे मिटल्यावर.....  (Read 1863 times)

नसणार मी या जगात,
तू सोडून गेल्यावर.....

एकटा जगू शकणार नाही मी,
तू मला विसरल्यावर.....

काही क्षण दुःख विसरेल मी,
तू एकदा शेवटच भेटल्यावर.....

तिळ तिळ तुटेल मी,
तू विनाकारण रागवल्यावर.....

सुखी नाही राहणार मी,
तू विरहाचे दुःख दिल्यावर.....

विसरु शकेल मी तुला,
फक्त डोळे मिटल्यावर.....

फक्त डोळे मिटल्यावर.....
:'(  :'(  :'(  :'(  :'(

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक ०३-०२-२०१४...
सांयकाळी ०६,२३...
© सुरेश सोनावणे.....