Author Topic: नकोस  (Read 992 times)

Offline कवी-गणेश साळुंखे

  • Full Member
  • ***
  • Posts: 883
  • Gender: Male
नकोस
« on: February 07, 2014, 02:45:23 PM »
* नकोस *
मी तुझी होणार नाही
माझं स्वप्न ही बघु नकोस
हाती तुझ्या काही लागणार नाही
प्रेम माझ्यावर करु नकोस

मी काही दिवसांची सोबती रे
न्यायला मला मरण आलंय रे
माझ्यात मन गुंतवु नकोस
स्वताहुन स्वताला फसवु नकोस

मी गेल्यावर खुपच रडशील
एकांताच्या विरहात उसासे सोडशील
माझ्यासाठी स्वताला दुखवु नकोस
मेल्यावर ही मला रडवु नकोस

मी सांगितले तिला शेवटचे
आतातरी मला अडवु नकोस
अंतर दुराव्याचे अजुन वाढवु नकोस
राहिलेत जे दिवस तुझे ते
तरी माझ्यापासुन हिरावु नकोस
प्रेमच प्रेम करु दे मला
मिठीतुन तुझ्या दुर करु नकोस
आयुष्यभर पुरेल मला प्रेम तुझे
साठवण्यापासुन मला रोखु नकोस...!
कवी-गणेश साळुंखे...!
Mobile - 8108368222

Marathi Kavita : मराठी कविता