Author Topic: कळलेच नाही .....................  (Read 1449 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
कळलेच नाही .....................
« on: February 13, 2014, 09:28:53 AM »
पापण्यांत माझ्या स्वप्ने तुझी भरलेली असायची
नकळत ती सारी चेह-यावर कधी ओघळून आली कळलेच नाही.....
तुझ्या सोबत आयुष्य नव्याने सुरु झाले होते
सुरुवातीचा शेवट इतक्या लवकर कधी आला कळलेच नाही ......
तुझा हात हातात घेऊन तासनतास चालायचो .....
हातामधले हात सुटले कधी कळलेच नाही ..........
तुझं निरागस हसू पाहून मीही जरा हसायचो
हसता हसता डोळे भरून कधी आले कळलेच नाही..................
तुझ्या चेह-यावर पडलेले पावसाचे थेंब तळहातावर झेलायचो
आज तोच पावसाचा थेंब गालावर कधी सांडला कळलेच नाही................
तुझ्या प्रेमात नव्याने जगायला शिकलो मी
पण ते आयुष्य क्षणिक कधी झाले कळलेच नाही .....................
                                               

Marathi Kavita : मराठी कविता