Author Topic: तसेच राहू दे............  (Read 1111 times)

Offline Er shailesh shael

  • Jr. Member
  • **
  • Posts: 77
  • Gender: Male
तसेच राहू दे............
« on: February 13, 2014, 09:37:42 AM »
.फुलला गुलमोहोर तुझ्या अंगणी.....
 
हाती कोमेजल्या पाकळ्या माझ्या त्या तशाच राहुदे.....
 
विस्फारुनी जग पाहता रूप तुझे
 
विरहाच्या तिमिरात चाचपडणा-या पापण्या माझ्या तशाच मिटू दे.....
 
मनी माझ्या अव्यक्त भावना अन शब्दांचे सडे
 
उतरले थेट त्या पाना-पानावर ते तसेच राहू दे............
 
संवेदना मनी माझ्या कोरल्या हाती आज तुझ्या
 
कोवळया मेंदीचा तो रंग पुसटसा माझ्या आठवणीसारखा तसाच राहू दे .....


                                                                    -Shailesh Shael

Marathi Kavita : मराठी कविता