Author Topic: अहो चा मी आता मिस्टर झालो आहे  (Read 894 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
अहो चा मी आता
मिस्टर झालो आहे
पुसलेल्या संसाराचा
डस्टर झालो आहे
नाही त्यात आता
काही वाउगे नाही
शोभेचेच मी एक
क्लस्टर झालो आहे
देणे घेणे कुणाशी
उरले न काही माझे
जगण्याचे वरवर
जस्टर झालो आहे
आणिला कुठून कुणी
टोचेना टोचून जो 
शब्द इंग्रजी एक
स्टिकर झालो आहे

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: April 19, 2014, 12:28:31 AM by MK ADMIN »