Author Topic: तू जवळ नसताना देखिल....  (Read 3176 times)

Offline monikadhumal

 • Newbie
 • *
 • Posts: 20
तू जवळ नसताना देखिल....
« on: February 18, 2014, 10:41:41 AM »
तू जवळ नसताना देखिल....
आजकाल मी रात्र रात्र जागते...
कधी कधी मी स्वतःशीच...
तर कधी तुझ्या आठवाणींशी..
मनसोक्त गप्पा मारत राहते...

तुझ्याशी बोलुन झाल्यावर...
अजुनदेखिल...
तुझी ती गोडबडबड
माझ्या कानात गुणगुणत राहते...

कधी तुझं लाडीक हसणं आठवतं
तर कधी तुझं स्पष्ट बोलणं आठवतं...

कधी कधी या आठवणी
स्वप्नातल्या विश्वात घेऊन जातात...
आणि कधी कधी त्या
तुझ्या माझ्या अनमोल नात्याची जाणीव करुन देतात...

हे सगळं आठवताना नकळत कुठे जरासा डोळा लागतो...

अन् मी पुन्हा दचकून जागी होते...

तुझी आठवण मनाला फारच जोरात चिमटा काढून जाते रे...
अन् मी नेहमी प्रमाणे पुन्हा एकदा मी माझी रात्र जागुन काढते.....
 
                                                                        - Monika
« Last Edit: February 18, 2014, 10:45:32 AM by monikadhumal »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline शिवाजी सांगळे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,266
 • Gender: Male
 • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
Re: तू जवळ नसताना देखिल....
« Reply #1 on: February 18, 2014, 04:26:54 PM »
"तू जवळ नसताना देखिल....
आजकाल मी रात्र रात्र जागते...
कधी कधी मी स्वतःशीच...
तर कधी तुझ्या आठवाणींशी..
मनसोक्त गप्पा मारत राहते..."

मोनिका, खरच छान.... लिहित रहा.... गुड लक

Offline monikadhumal

 • Newbie
 • *
 • Posts: 20
Re: तू जवळ नसताना देखिल....
« Reply #2 on: February 18, 2014, 05:15:27 PM »
Thank you Shivaji.

Nittya

 • Guest
Re: तू जवळ नसताना देखिल....
« Reply #3 on: March 12, 2014, 02:07:31 PM »
so sweet !!! मोनिका, खरच छान !!!

Offline monikadhumal

 • Newbie
 • *
 • Posts: 20
Re: तू जवळ नसताना देखिल....
« Reply #4 on: March 16, 2014, 09:12:20 PM »
Thanks Nittya

nikhil rajahans

 • Guest
Re: तू जवळ नसताना देखिल....
« Reply #5 on: April 05, 2014, 06:49:36 PM »
really heart tching n awesome dear..