Author Topic: दुखी मना …  (Read 1322 times)

Offline saili

  • Newbie
  • *
  • Posts: 1
दुखी मना …
« on: February 22, 2014, 11:15:25 PM »
दुखी मना …

दुखी मना सांग तुला कसं खुश करू
कसं तुला त्या बालपणाच्या सुखी
आठवणीत घेयुन जाऊ …

कसं तुला त्या छोटया छोट्या आनंदात
होणाऱ्या निष्पाप मनाकडे घेयुन जाऊ ….
ते आईचे गोजारणे … ते बाबांचे कौतुक करण
त्या आजीची माया … ती भावंडांची मस्ती
तो काळ ती वेळ… सगळं मनाला
हुर हुर लावणाऱ्या आठवणी …कस आणुन देऊ…

धकाधकीच्या ह्या जीवनात स्वताला सिद्ध करण्याच्या
ह्या शरियेतेत … लुप्त झालंय तो काळ ती वेळ
तरीही मन वळतेय जुन्या आठवणींकडे त्या
गेलेल्या काळाकडे….

आणुया तो काळ ती वेळ परत ….
जिथे माणसाना किमत असेल … पैश्याला नाही
प्रेमाला कीमत असेल … रुद्ब्याला नाही
जिथे स्वच्छ हवा …. फुलांचा सुगंध मनाला आनंद देईल …

सांग मना कसा तो काळ ती वेळ आणु
कस खुश करू तुला ????

सायली

please share your views on my poem...

Marathi Kavita : मराठी कविता