Author Topic: सुखांत कि दु:खांत ?  (Read 1163 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,333
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
सुखांत कि दु:खांत ?
« on: March 02, 2014, 11:42:47 PM »
सुखांत कि दु:खांत ?

होती आपल्यात, एकच छत्री
फीरायचो सारे, टोळकं करून,
आठवतात? कॉलेजचे दिवस?
अचानक यायचा, पाऊस फीरून !

एक दिवस मला, ती दिसली
ठरलं पटवायची, काही करून,
पडला सा-यांना, एकच प्रश्न
घ्यावी कशी, ओळख करून?

पाहिलं होतं, दोन एक वेळा
यायची कुणालातरी, बाय करून,
लावली फिल्डिंग, तेंव्हा समजलं
जायचा भाऊ, बाईकने सोडून !

येस, म्हणता, परीक्षेचे दिवस
येवू लागले, पुन्हा फीरून,
एके दिवशी, बाबा कॉलेजात
आले स्वतः तीला घेउन ! 
 
कुणाकडे? काय काम आहे ? 
विचारला प्रश्न, धीर करून,
तीनं सांगीतली, त्यांना ओळख
कॉलेजचा क्लोज, मित्र म्हणून !

ठार झालो, मी क्लिनबोल्ड
नंतर दोस्तांनी, घेतलं घेरून,
हॉटेलात ने, चल साल्या, 
पाहिजे पार्टी, पोट भरून !

   
होवू लागली, आमची गट्टी
जायचे दोस्त, कल्टी मारून,
गोची त्यांची, होती कळत
दिली तिला, जाणीव करून !

म्हणाली ती, हसत तेंव्हा
दोस्त सगळे, गोळा करून,
घेऊच नका, तुम्ही टेन्शन
मारा हाक, ताई म्हणून !

मस्त शिकून, नोकरी करू
लागलीच घेवू, लग्न उरकून,
दोनच मुलं, हवी आपल्याला
नावं त्यांची, बसलो ठरवून !

काहीतरी पुढे, गोंधळ झाला
अचानक गेली, ती गायब होवून,
शोध घेतला, तेव्हां समजलं
अॅडमिट होती, पेशंट म्हणून !

डोक बधीर, सुधरेना काही
देवा, कर बरी, कॅन्सर मधून,
सावर स्वत:ला, म्हणाले बाबा
उराशी मला, घट्ट धरून !


© शिवाजी सांगळे
 « Last Edit: November 21, 2015, 05:31:33 PM by शिवाजी सांगळे »

Marathi Kavita : मराठी कविता