Author Topic: काय दिवस होते ते........  (Read 1683 times)

काय दिवस होते ते........
« on: March 06, 2014, 02:56:22 PM »
काय  दिवस होते  ते
कुणीतरी आपले असायचे
हस~या चेह~यामागे दडलेलं दु:ख
कुणी सहजच  ओळखायचे ................

सारखेच  वाटायचे असावे कुणीतरी
पण ती मात्र दूर असायची
जवळ असली कि नजर
तिच्या हसण्यावरच   माझी असायची
किती सहज दूर करायची विचारांचे प्रदूषण
अन मोकळे मन करून थोडे हस म्हणायची .................

काय दिवस होते  ना..  ते हसत खेळत घालवले
सोबत आहेत ते क्षण आजही
फक्त न फक्त आठवणरुपी
तिचा मात्र काहीच पत्ता नाही ..............

काय दिवस होते ना ते
एकमेकांस भेटून आनंदी होण्याचे
पण आता चोहीकडे भयाण आहे
तू कुठेतरी दूर आहेस
अन..मी हरवलेल्या ह्या अंधारात आहे .............
-
©प्रशांत डी शिंदे.....
दि.०६-०३-२०१४

Marathi Kavita : मराठी कविता