वाट
का आज तु आलास माझ्या स्वपःनात?
एक नविनच आशा जागवून गेलास मनात,
विसरली होती मी जे वेड परत ते लावलेस;
कोणत्या कारणांसाठी तू ह्दय माझे तोडलेस?
ज्या क्षणी तु आलास माझ्या आयुष्यात;
नंदनवन फुलले होते तेव्हा माझ्या ह्दयात,
परंतु काहीही न सांगताच तु निघुन गेलास,
आयुष्याची माझ्या फार वाट लावुन गेलास.
कान आतुर झालेत माझे फक्त एवढंच ऐकण्यासाठी,
माझे तुझ्यावर प्रेम आहे या चारच शब्दांसाठी,
समजेनासे झाले मला आता मी काय करु ?
किती काळ तुझी अशीच वाट पाहत राहु ?
- संतोषी साळस्कर.