Author Topic: माफीनामा  (Read 1230 times)

माफीनामा
« on: March 12, 2014, 01:49:34 AM »
तुझ्या प्रत्येक प्रेम
पाकळीची शपथ मला
माझ्याकडे पाहून लाजलेल्या मुखड्याची सुद्धा
घडणार ना असा
परत कधी गुन्हा
एकदा शेवटचं माफ करशील ना मला


तुझ्या मनात असणार्‍या
प्रीतीची शपथ मला
तुझ्या मऊ हाताच्या प्रेमळ स्पर्शाची सुद्धा
अगणित वेळा
दुखविले तुला
एकदा शेवटचं माफ करशील ना मला


तू केलेल्या कित्येक
आठवणींची शपथ मला
तुझ्या अश्रुच्या प्रत्येक थेंबाची सुद्धा
कित्येक वेळा
रडविले तुला
एकदा शेवटचं माफ करशील ना मला


माझ्यासाठी जागलेल्या
कित्येक रात्रींची शपथ मला
मी दिलेल्या प्रत्येक नव्या त्रासाची सुद्धा
घडणार ना असा
परत कधी गुन्हा
एकदा शेवटचं माफ करशील ना मला

 

..... अनुराग
http://kavyanurag.blogspot.in/

Marathi Kavita : मराठी कविता


kailas kolekar

  • Guest
Re: माफीनामा
« Reply #1 on: March 15, 2014, 04:13:35 PM »
तुझ्या प्रत्येक प्रेम
पाकळीची शपथ मला
माझ्याकडे पाहून लाजलेल्या मुखड्याची सुद्धा
घडणार ना असा
परत कधी गुन्हा
एकदा शेवटचं माफ करशील ना मला


तुझ्या मनात असणार्‍या
प्रीतीची शपथ मला
तुझ्या मऊ हाताच्या प्रेमळ स्पर्शाची सुद्धा
अगणित वेळा
दुखविले तुला
एकदा शेवटचं माफ करशील ना मला


तू केलेल्या कित्येक
आठवणींची शपथ मला
तुझ्या अश्रुच्या प्रत्येक थेंबाची सुद्धा
कित्येक वेळा
रडविले तुला
एकदा शेवटचं माफ करशील ना मला


माझ्यासाठी जागलेल्या
कित्येक रात्रींची शपथ मला
मी दिलेल्या प्रत्येक नव्या त्रासाची सुद्धा
घडणार ना असा
परत कधी गुन्हा
एकदा शेवटचं माफ करशील ना मला

 

..... अनुराग
http://kavyanurag.blogspot.in/