Author Topic: वाट पाऊले निघालो  (Read 759 times)

Offline athang

  • Newbie
  • *
  • Posts: 43
  • Gender: Male
वाट पाऊले निघालो
« on: March 15, 2014, 11:35:13 AM »

वाट पाऊले निघालो मागे चाहूल कोणाची?
मागे वळून पाहता उरे झुळूक वाऱ्याची

चालताना उडे धूळ गंध मातीस उरेना
सुटले मन मागे … बंध मनीचे सुटेना

घनराईतून शीळ, काही ओळखीच्या खुणा
सावलीस साथ माझी देह अंतरीचा उणा

चालताना मग काटा कधी रुतेल पायात
वाहे पायातून जीव दाटे आभाळ डोळ्यात

वाट पाऊले निघालो मागे चाहूल कोणाची?...

« Last Edit: March 15, 2014, 11:56:34 AM by athang »

Marathi Kavita : मराठी कविता