Author Topic: पाऊस त्याच्या तिच्या प्रेमाचा...  (Read 802 times)

Offline Prasad.Patil01

  • Newbie
  • *
  • Posts: 39
घनछाया दाटून आली,
सरिता धरणीस मिळाली,
त्याला तिची आठवण आली,
त्या सांजवेळी...

अंगावर थेंब पडले,
आठवले जे होते घडले,
त्याचे तिचे नाते जुळले,
याच पावसात...

त्याच तिचं लपून भेटण,
जवळ आल्यास अल्लळ लाजन,
दोघांच हि पावसात भिजण,
बेधुंद होऊन...

आठवताच ती सारी कहाणी,
डोळ्यात त्याच्या आलं पाणी,
गेली का ती अशी निघुनी,
न सांगताच ??
                -  प्रसाद पाटील