Author Topic: साहेब आज तुम्ही असायला हवे होतात...  (Read 954 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
साहेब आज तुम्ही असायला हवे होतात...
तुम्ही लावलेल्या झाडाची दशा पहायला हवे होतात
शिवरायांनंतर स्वराज्याचे रक्षक तुम्हीच तर होतात
कांग्रेससारख्या अफजलखानाचे भक्षक तुम्हीच तर होतात
आज खरी गरज आहे महाराष्ट्राला तुमची
निवडनुकिच्या ह्या रणांगडावर तुम्हीच परत लढायला हवे होतात
साहेब आज तुम्ही असायला हवे होतात...
तुम्ही काढलेला पक्ष आणि त्याची पक्षवाराची निष्ठा
तुम्ही रुजवलेले नियम आणि त्यांची प्रतिष्टा
आज सारेकाही धुळीला मीळतेय शिवासैनिकाचा विश्वास हरतोय
हराणारया शिवासैनिकाला सावरायला हवे होतात
साहेब आज तुम्हीं असायला हवे होतात...
तुमच्या अंगाखांद्यावर वाढलेले दोघे एकमेकांवर आरोप करतात
पक्षाला गरज आहे त्यांच्या एकत्र येण्याची
तुमच्या लेकराना आज तुम्ही समजावायला हवे होतात
साहेब आज तुम्ही असायला हवे होतात....
साहेब मी कोणी कट्टर शिवसैनिक नाही की तळागळाचा कार्यकर्ताही नाहीं
पण जन्मल्या पासून तुम्हालाच ऐकल आदर्श मानल
शिवसेनेला आणि तुम्हाला सर्वस्व मानल
संकटात आहे माझे सर्वस्व आज
तुम्हीच आज ते वाचवायला हवे होतात
साहेब आज तुम्ही असायला हवे होतात...
साहेब आज तुम्ही असायला हवे होतात...

.... अंकुश नवघरे©
.... Ankush Navghare.
02/04/2014.