Author Topic: तुला वाटत असेल मी तुला विसरलो..  (Read 1408 times)

तुला वाटत असेल मी तुला विसरलो
कुणाच्या स्वप्नांत मी ही आता हरवलेलो असेल

आजकाल तुझ्याकडे पाहतही नाही
तुला वाटत असेल मी तुला आठवतही नसेल

खरे तर ...
जसे तु ही मला चोरुन पाहतेस
तसे माझी आजही तुझ्यावर नजर आहे

तुला वाटत असेल मी आता खुष असेल
पण तुझ्याशिवाय कसला आनंद
तुला ठाऊक आहे तुझ्याशिवाय माझे मीच नसेल

तुच शिकवलंस पुन्हा प्रेमात पडायला
जुन्या जखमा लपवुन पुन्हा थोडं हसवायला

माझे प्रेम आहेस
तुच शिकवलंस ना शोना हरतानाही उठुन जिंकायला....
-
©प्रशांत डी शिंदे
दि.06-04-2014