Author Topic: आता सवय झाली आहे.......  (Read 1620 times)

Offline vidyakalp

  • Newbie
  • *
  • Posts: 35
आता सवय झाली आहे.......
« on: April 09, 2014, 10:43:18 PM »
तुझ्या आठवणींना कुरवळायची
आता सवय झाली आहेे
तुझ्या फोनची वाट पहायची
आता सवय झाली आहे
तुझी वाट पाहणा-या डोळ्यांना
आता सवय झाली आहे
तुझ्या भेटीला धावणा-या पावलांना
आता सवय झाली आहे
तुझ्या केसात फिरणा-या हातांना
आता सवय झाली आहे
तुझेच नाव घेणा-या ओठांना
आता सवय झाली आहे
तुझी आठवन काढणा-या ह्रदयाला
आता सवय झाली आहे
रोज तुझ्यासाठी उगवणा-या गुलाबाला
आता सवय झाली आहे
का आलीस तु पुन्हा समोर?
तुझ्याशिवाय जगण्याची सगळ्यांना
आता सवय झाली आहे.......
तुझ्याशिवाय जगण्याची सगळ्यांना
आता सवय झाली आहे.......

$ vidyakalp $

Marathi Kavita : मराठी कविता