Author Topic: तरी का हि दूरी.........  (Read 1111 times)

Offline kavita.sudar15

  • Newbie
  • *
  • Posts: 28
तरी का हि दूरी.........
« on: April 14, 2014, 08:29:16 AM »
अनोळखी तू मला अन मी तुला,
  भेटलो जेव्हा पहिल्यांदा सूर जुळले तेव्हा........

बोलण्यातून एकमेकांस ओळखू लागलो,
  तू माझ्यातून तुला अन तुझ्यातून मला.......

हृदयाची तेव्हाच तू छेडली तार,
  तुझ्यात सारे भान हरपून गेलो,
   तुझ्या नजरेचे कितीतरी झेलत वार........

तुला विचारावे म्हटले जेव्हा जेव्हा,
  काय म्हणशील या भीतीनेच जात राहिला तोल तेव्हा तेव्हा.......

विचारिले तुला तू हो म्हणशील याच एका आशेने,
  नकार तेव्हा तुझ्या चेहऱ्यावर अन,
   डोळे काही वेगळेच सांगत होते माझ्या दिशेने........

नाही तू म्हटलेस खरे पण,
  तुझे मन तरी मानत होते का? हे सारे.........

पुन्हा त्याच वाटेवर पुन्हा तू भेटलीस,
 नजरानजर होऊन मनात भरलीस........

यावेळेस तुझी नजर काही वेगळेच सांगत होती,
  माझ्या प्रेमाची कबुली तुझी नजरच देत होती........

होकार तुझा ऐकण्यास आतुर माझे मन,
   तुझ्या होकाराच्या आनंदात सजले माझे क्षण........

प्रेम जडले एकमेकांचे दोघांवर,
  तुझ्यात मी अन माझ्यात तू,
   हे सुखच आहे अनावर........

एके दिवशी वाटले किती दूर राहायचे आपण,
  होऊ वर वधू  तोडून जगाचे बंधन.........

आनंदाचे आकाश ठेंगणे घेऊन तुझ्याकडे आलो,
  तुझ्या मात्र एका नकाराने पूर्ण पणे खचलो........

कोणते असे कारण आहे जे तू सांगत नाही,
  प्रेम करते जीवापाड तरी तू ते दाखवत नाही........

कधी न कधी होशील कायमची माझी,
  येशील सारी बंधने लाथाडून तू आहे सतत वाट पाहण्यास तुझी..........

वाट तुझी पाहीन चातकापरी,
  राहतेस माझ्या मनी तरी का हि दूरी........
   राहतेस माझ्या मनी तरी का हि दूरी........ @कविता@

Marathi Kavita : मराठी कविता