Author Topic: मरावच लागेल मलाही...  (Read 1319 times)

Offline Ankush S. Navghare, Palghar

  • Full Member
  • ***
  • Posts: 779
  • Gender: Male
  • तु मला कवी बनविले...
मरावच लागेल मलाही...
« on: April 16, 2014, 10:10:52 PM »
माझे धागे तुटणार आहेत
पहाव हे लागेल मलाही
कुणाच्यातरी सुखासाठीच
कराव लागेल मलाही
प्रेमात हे असेच असते
घेण्यापेक्षा देण्यात असते
दुख मनात दाबुन ठेउन
सोसाव लागेल मलाही
तुला अवघडल्यासारख वाटेल
मलाही ते वाटत असेल
तुझे वाटण वेगळ आहे
मानाव लागेल मलाही
जरी जिंकिन मी हयात
अणि हरशिल तू तरी
जिन्कलेल्या खेळासाठी
हराव लागेल मलाही
हसत हसत निरोप देइन
अश्रु नाही येउ देणार
तू सोडून गेल्यावर
मरावच लागेल मलाही...
मरावच लागेल मलाही..

...अंकुश नवघरे
16/04/2014.

Marathi Kavita : मराठी कविता