Author Topic: विसरलीस कशी तू ?  (Read 1373 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,269
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
विसरलीस कशी तू ?
« on: April 17, 2014, 12:25:47 PM »
विसरलीस कशी तू ?
प्रेमबंध आपले घट्ट एवढे
मनाशी तनाचे नाते जेवढे !

विसरलीस कशी तू ?
सुरांचे शब्दांशी नाते जेवढे
झेललेल्या तुझ्या बोलां एवढे !

विसरलीस कशी तू ?
थेंबथेंब अश्रू सागरा जेवढे
दिलेले वचन आभाळा एवढे !

विसरलीस कशी तू ?
अश्रुंचे ओझे पापणीला जेवढे
मनालाही ओझे ते ‘मणा’ एवढे !


©शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता