Author Topic: शांतच होती आज मामाची छकुली  (Read 1057 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
त्यादिवशी सुर्य पण खरच थकला होता,
रोज-रोजच्या प्रवासात तो आज दमला होता,
रोज-रोज तोच आज जागला होता,
त्यादिवशी खरच सुर्य थकला होता।।

मामा मामा म्हणत किलबिलणारी,
सापडत नव्हता त्या चिमुकलीचा आवाज,
वाटत होते ढगात तोंड बुडवुन,
सुर्य ही रडत होता आज।।

मामाची चिमुकली, ताईची सोनुली,
बाबाची खोडकर तर आजीची नखरेबाज नात,
वडिलांची साथ सोडुन गेली,
साऱ्यांच्या ह्रदयात एक आस सोडुन गेली।।

खांद्यावर बसुन नाचणारी,
रडवलं की रडणारी,
हसवले तर खुळणारी कळी,
आज शांतच होती माझी छकुली।।

मायेचे कित्येक लाड आज व्यर्थच होते,
पाटीवर लिहुन काढलेले,
रात्रीचे पाढे आज
न वाचता पाटीवरच कोरडे राहिले होते।।

↝↝S. More↜↜