Author Topic: तुझ्या विना जगने असाहय..  (Read 2237 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
          तुझ्या विना जगने असाहय..

तुझ माझ बिनसत जेंव्हा जेव्हा,
वाटत आयुष्य इथेच संपुन जाव,
धरणीला फाडुन खोल खोल जिरून जाव....
आभाळाचा भार होतो,अन
जमिन पायाखालची,निसटून जाते नकळतच.
अबोला असताना मन खिन्न होऊन जात.
वाटत, आयुष्य ईथेच संपुन जाव....
एक एक क्षण,
वर्षाव दुखःचा झेलत जातो.
जगने माझेच मला असाहय होऊन जाते,
तु नसताना प्रितीचा अर्थ कळू लागतो.
तडफडत असते मन जेव्हा जेव्हा,
प्रेम कस्तुरीच्या शोधात,
दोन क्षणाचा अबोला पण,
वर्षा वर्षाचा भास वाटतो.
गहीवरून जाते मन,
अन सगळीच नाती परकी वाटतात.
अचानक आलेल्या वादळाने,
-हदय गुदमरू लागते,अन
वाटत आयुष्य इथेच संपुन जाव..
वाटत आयुष्य इथेच संपुन जाव........

Marathi Kavita : मराठी कविता


yogesh humane

  • Guest
Re: तुझ्या विना जगने असाहय..
« Reply #1 on: May 05, 2014, 07:25:02 PM »
love msg pathv na.

रेणुका

  • Guest
Re: तुझ्या विना जगने असाहय..
« Reply #2 on: May 13, 2014, 03:21:31 AM »

"तु नसताना प्रितीचा अर्थ कळू लागतो."

~~~~~~~~~~~~~~~~~

तारुण्यातल्या हॉर्मोन्सपायी
स्त्रीपुरुषांना वाटते जे
परस्परांबद्दल आकर्षण
त्याला नित्याचे नाव "प्रीती"

"डेटिंग्‌"नंतर काही दिसांनी
काही वेळा म्हणते ती आपल्याशी
काही वेळा म्हणतो तो आपल्याशी
काही वेळा दोघेही म्हणती -

"शोधू या दुसरे ’प्रीतीस्थान’"

शोधू लागता तो अन्य ’प्रीतीस्थान’’
काही वेळा काही काळ
टाकते ती उसासे ’विरहाने’
शोधू लागता ती अन्य ’प्रीतीस्थान’’
काही वेळा काही काळ
टाकतो तो उसासे ’विरहाने’

संपतात काही दिसांनी
त्याचे वा तिचे उसासे अन्‌ मग
 होते कोणाशीतरी दोघांचे
’शुभमंगल’, म्हणती भटजी जेव्हा
प्रत्येक वेळी, "सावधान!"

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
Re: तुझ्या विना जगने असाहय..
« Reply #3 on: May 13, 2014, 02:15:29 PM »
रेणुका तुम्ही काही गैर समज केलेला आहे.
प्रिती म्हणजे शारीरीक आकर्षन नसते. नाटकी प्रेमाला कधीच विरह वैगेरे होत नसतो.
ज्यांच खरच प्रेम असत, त्यात मन मिळालेली असतात. तारूण्यातच प्रेम होत असेल तर,
आज प्रत्येक वृद्ध जोडपी तूटुन पडलेली दिसली असती.व कुटूंब संस्था उधवस्त झाली असती.
प्रत्येक कविता कधी आपल्याशी,तर कधी काल्पनीक कराव्या लागतात.पण प्रत्येक कवितेतुन
आशय प्रकट होणे महत्वाचे असते. कृपया होता होईल तेवढा चांगला अर्थ काढावा.
कधी कधी दोन क्षणाचा अबोला पण खरे प्रेम असना-यांसाठी विरहाचा वाटू शकतो.
« Last Edit: May 13, 2014, 02:17:13 PM by SONALI PATIL »

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):