Author Topic: दुरावा ....  (Read 2893 times)

दुरावा ....
« on: May 26, 2014, 03:29:18 PM »
जरा दूर गेल्यावर
तुलाही तेव्हा कळेलच
हसत जाते आहेस
वळणावर थोडे अंतराने
तुझेही डोळे भरणारच

नको आहे हा रुसवा
नको असा अबोला
पण काळाने घेरले दोघांस
अन नशिबी आला हा दुरावा

प्रेमाचे बंधन हे आहे श्वास दोघांचे
कधी तू तर कधी मी बनतो ठोके हृदयाचे
आठवण येते तुझी
मानस समजावा लागतं
तुझ्या सुखासाठीच प्रिये
मला असे एकटेच जगावे लागतं
-
©प्रशांत डी शिंदे
दि.२६-०५-२०१४
 

Marathi Kavita : मराठी कविता


RAAHUL

  • Guest
Re: दुरावा ....
« Reply #1 on: June 01, 2014, 11:22:57 AM »
khup chaan............NEHAMISARKHA PUNHA EKDA APRATIM....

Re: दुरावा ....
« Reply #2 on: July 30, 2014, 04:53:15 PM »
khup chaan............NEHAMISARKHA PUNHA EKDA APRATIM....

:) dhanyvad