Author Topic: कालही माझीच अन आजही फक्त माझीच आहेस ....  (Read 3265 times)

दूर गेलीस निघून
आठवणी मागे ठेवल्यास

तुझे स्वप्न पाहणाऱ्या डोळ्यांत
आज फक्त अश्रुधारा उरल्यात

तुलाही ठाऊक असेलच
माझ्या हृदयाचे हुंदके
पण ....
तू येऊ शकणार नाहीस ठाऊक आहे मज ते

मनाला हि आता समजावतो आहे
तू कुण्या दुसर्याचीच झाली आहेस 

पण मनन मनात नाही
म्हणतं सारखं
" तू कालही माझीच अन आजही फक्त माझीच आहेस ....."
-
©प्रशांत डी शिंदे....
दि.१०-०६-२०१४