Author Topic: हा खेळ फक्त वाट पाहण्याचा...............  (Read 1796 times)

Offline Mayur Jadhav

  • Jr. Member
  • **
  • Posts: 68
  • Gender: Male
  • शब्द हेच जीवनातील खरे सोबती .
हा खेळ फक्त वाट पाहण्याचा...............

गहिवरून वाहीला तो बांध फुटलेल्या अश्रूंचा
अन आता कुठेच दिसेना एकही क्षण तो विसाव्याचा ,
क्षणाक्षणाला होतोय भास तुझ्या आठवणींचा
अन आता विखुरलेत हे क्षण खेळ फक्त मनाचा ..........
प्रत्येक क्षणाला आभास होतो तू जवळ असल्याचा
अन आता मला कळून चुकते हा डाव माझ्या एकट्याचा ,
तिच्याच पासून सुरु होयचा दिवस अन तीच शेवट संपण्याचा
अन आता एकटाच सुरु होऊन संपतोही  दिवस खेळ फक्त आसवांचा .......
एक क्षण दूर झाली ती तरी आयुष्यात अंधार वाटायचा
अन आता कुठेच दिसत नाही ती म्हणून वाटतोय दिवसही रात्रीचा ,
ती येईल नक्की परत हेच प्रयत्न करतय सतत मन सांगण्याचा
अन आता माझ्याजवळ उरलेच नाही काही हा खेळ फक्त वाट पाहण्याचा ........

  मयुर जाधव ,
  कुडाळ ( सातारा ) ,
+918888595857 .