Author Topic: पाउस कधीचा पडतो  (Read 1057 times)

Offline केदार मेहेंदळे

  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,674
  • Gender: Male
  • मला कविता शिकयाचीय ...
पाउस कधीचा पडतो
« on: July 07, 2014, 10:26:23 AM »
…………………………………………………….पाउस कधीचा पडतो
 
भिजल्या जमिनीवर वेडा
तो सरी सरी बरसवतो
कोरडाच ठेवूनी मजला
पाउस कधीचा पडतो
 
भिजल्या मातीत सुखाचा 
शीतळ शिडकावा करतो
विरहात जाळण्या मजला
पाउस कधीचा पडतो
 
भिजल्या झाडांवर रमल्या
जोड्या चिमण्याच्या ओल्या
एकटाच भिजवण्या मजला
पाउस कधीचा पडतो
 
भिजल्या गंधात मातीच्या
आसमंत असा दरवळला
धुंद्वून तुझ्या गंधांनी
पाउस कधीचा पडतो
 
भिजल्या वाटेवर डोळे
शोधती तुझी चाहूल
येशील कधी प्रिये तू?
पाउस कधीचा पडतो
 
…………………………………………………….पाउस कधीचा पडतो

 
केदार…

Marathi Kavita : मराठी कविता