Author Topic: दिवस सारा अंधारला...  (Read 1595 times)

Offline शिवाजी सांगळे

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,270
  • Gender: Male
  • या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे.....
दिवस सारा अंधारला...
« on: July 12, 2014, 08:41:17 PM »
पागोळीत, पाऊस थेंब,
अलगदच घरंगळला !
आतुरल्या प्रेयसीच्या
नेत्री, अश्रू ओघळला !!

दाटला, गर्द नीरनभ
कंठ प्रतीक्षेत गहिवरला !
नाजूक, कोमल अधरी
अस्पष्ट, हुंदका अडला !!

येईल, साजन केंव्हा?
पाऊस पुन्हा गडगडला !
नाही चाहूल पावलांची
दिवस सारा अंधारला !!

© शिवाजी सांगळे

Marathi Kavita : मराठी कविता