Author Topic: बरे झाले संपले ते  (Read 1385 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
बरे झाले संपले ते
« on: July 22, 2014, 11:07:29 PM »
आरंभ नव्हता कधी
अंतास कसे रडावे
अरे खेळणे मनाचे
मनास कसे कळावे

एक भूल अनावर
व्यापून उरे मनाला
मिटलेले दार घट्ट
उगा उघडे कशाला

असे शब्द बुडबुडे
जगी लाख फुटतात
पोटाचा खड्डा भराया
टके चोख लागतात

बरे झाले संपले ते
आपण टाळ कुटावे
जरतारी पदरा त्या
पडदा अन म्हणावे

विक्रांत प्रभाकर

« Last Edit: July 23, 2014, 10:00:59 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता