Author Topic: तू रोमारोमांत असतांना  (Read 921 times)

Offline madhura

  • Jr. Member
  • **
  • Posts: 271
  • Gender: Female
  • I am Simple
प्रीत अधुरी राहिली
असं कां म्हणू मी
तू नाहीस जीवनात
म्हणून कां रडू मी

अश्रू तर कधीच माझे
मला सोडून गेले
जेव्हा माझे मन
प्रेमात पडून गेले

तुझी साथ लाभता
क्षण क्षण उजळले
तू साद घालता
मन माझे मोहरले

आयुष्य जगणे बेधुंद
तुझ्यामुळे शिकलो मी
तू रोमारोमांत असतांना
विरहात कां जळू मी .
==================
संजय एम निकुंभ