Author Topic: तुटलेल्या झुंबराचा ...  (Read 1009 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तुटलेल्या झुंबराचा ...
« on: August 03, 2014, 09:11:13 PM »
तुटलेल्या झुंबराचा
पायाखाली खच झाला
पावूलांना भय त्याचे
काल डाव रंगलेला

मांडू मांडू म्हणूनिया
स्वप्न मांडता न येते
दु:ख भरलेले भांडे
नच कलंडून जाते

सुखाचीही स्मृती अंती
उरी दु:ख पाजळते
टाकुनिया दिले काटे
ठसठस नच जाते

जळूनिया जाता रान
त्यात कुणी किती मेले
एका किटकाचे विश्व
कधी कुणी मोजियले

विक्रांत प्रभाकर
« Last Edit: August 03, 2014, 09:24:42 PM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता