Author Topic: ती तशीच होती  (Read 1764 times)

Offline Pravin Raghunath Kale

  • Jr. Member
  • **
  • Posts: 115
  • Gender: Male
  • लेखणीतून या आज श्रावण धारा बरसल्या..
ती तशीच होती
« on: August 06, 2014, 07:39:59 PM »
ती तशीच होती
निरागस अल्लड आनंदी
अगदी मनसोक्त बरसणारया
पावसाच्या पाण्यासारखी

कधीतरी अगदीच बालिश
तर कधी एकदम गंभीर
प्रसंगी स्वभावही बदलणारी
ती तशीच होती

खरच सांगायचं तर
ती मला हवी होती
ती माझी अन
माझीच बनण्यासाठी

का माहित नाही
ती सोडून गेली
अचानक दूरवर कुठेतरी
त्या देवाच्या दाराशी

आज त्याच जागेवर
आम्ही दोघे नाही
तीही माझी नाही
फक्त आठवत होतो
ती तशीच होती
ती तशीच होती


Pravin Raghunath Kale
8308793007

Marathi Kavita : मराठी कविता