Author Topic: स्वप्नांना दूर जाताना पाहीलयं मी.....  (Read 1282 times)

स्वतःच्या स्वार्थासाठी,
दुस-यांचा वापर करताना,
पाहीलयं मी.....

आयुष्यभर साथ निभवण्याची,
खोटी वचने देताना,
ऐकलयं मी.....

मनात घर करुन,
नजरेत पडताना,
अनुभवलयं मी.....

कोणी नसतं कुणाच,
प्रेमाला वासनेत दरवळताना,
जाणलयं मी.....

स्वःपेक्षा जपलं तिला,
आयुष्य माझं निस्वार्थपणे,
वाहीलयं मी.....

खोटी असतात परखी नाती,
तिने दाखवलेल्या खोट्या,
स्वप्नांना दूर जाताना पाहीलयं मी.....

स्वप्नांना दूर जाताना पाहीलयं मी.....
.♥.  :'(  .♥.  :'(  .♥.

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक १५/०८/२०१४...
रात्री ०९:३९...
©सुरेश सोनावणे.....