Author Topic: पुन्हा कधी.....  (Read 1061 times)

Offline vinay shirke

  • Newbie
  • *
  • Posts: 3
पुन्हा कधी.....
« on: August 16, 2014, 04:00:21 PM »
पुन्हा कधी....
सोडुनिया जाशील अशी,
न येणार पून्हा कधी..
मनातल प्रेम माझ्या... ना,
तुला कळणार कधी..
झालेली भेट आपुली ही..ना,
विसरणार पुन्हा कधी....
नुसत्याच अता राहतील आठवणी,
    ना भेटणार पुन्हा कधी....

                    विनय शिर्के.9967744137

Marathi Kavita : मराठी कविता


विनय

  • Guest
Re:नात...
« Reply #1 on: August 16, 2014, 09:04:28 PM »
नात.....
निळ्या नभात रेखिले,
किती सुंदर हे नाते अपुले...
तुझ्याच आठवणीने आता,
झाले मन व्याकुळ हे...
विचारांनी जणू तुझ्या,
नभ मनी पांघरले....
यशस्वी व्हावे नाते आपुले,
   हेच नेहमी मागितले....


शोधू नका कोणी,
अर्थ डोळ्यात माझ्या....
जे मनी होते ते ठेविले,
कवितेच्या ओळीत माझ्या......
           विनय शिर्के 9967744137

विनय

  • Guest
माझी मैत्रिण.......
« Reply #2 on: August 17, 2014, 12:52:42 AM »
माझी मैत्रीण.....
मला माझ्या बाळपणी ,
साथ तिची मिळाली होती.....
दोघेही लहान तेंव्हा,
जोडी मस्त जमली होती....
माझ्याच संगे खे़ळली ती,
माझ्याच संगे हसली होती....
माझ्याच संगे रुसली ती,
माझ्याच संगे रडली होती....
माझ्याच संगे झोपाल्यावर,
साथ माझ्या बसली होती....
साथ देऊन माझ्या सुरान्ना,
गान तीही म्हटली होती....
तिच्याच साठी मीही तेंव्हा,
काही गाणी म्हटली होती....
काही तिची नावडती तर,
काही तिला पटली होती.....
पण........
आता सार वेगळ होत,
आता ती विसरली होती.....
कारण आता मैत्रीण माझी,
ख़ुप मोठी झाली होती.....
            विनय शिर्के 9967744137